Ad will apear here
Next
‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात
रत्नागिरी : शहरातील ‘दी गिफ्ट ट्री’ संस्था आणि पुणे येथील हरित मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ येत्या १४ जानेवारीला मारुती मंदिर येथे केला जाणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत (जि. रायगड) नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित राहणार आहेत. BytesofIndia.com हे पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल या उपक्रमाचे ‘ऑनलाइन मीडिया पार्टनर’ आहे.

प्लास्टिकमुक्त व स्वच्छ रत्नागिरीसाठी नगरपालिकेने कंबर कसली असून, परिसराच्या स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. नगरपालिकेच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत ‘दी गिफ्ट ट्री’ संस्थेचे सिद्धेश धुळप यांच्या पुढाकाराने ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरीतील उद्योजक किरण ऊर्फ भैया सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. धुमाळ, हरित मित्र परिवाराचे महेंद्र घागरे यांचीही विशेष उपस्थिती असेल.

समाजातील सकारात्मक घडामोडी, चांगले उपक्रम यांना प्रसिद्धी देणारे BytesofIndia.com हे ‘पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल’ रत्नागिरीतील या उपक्रमाचे ‘ऑनलाइन मीडिया पार्टनर’ आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, १४ जानेवारी २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ :
मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWCBK
Similar Posts
प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या रत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी नगरपालिकेने केले आहे. त्याला प्रतिसाद देऊन शहरातील ‘दी गिफ्ट ट्री’ ही संस्था पुढे आली असून, पुण्यातील हरित मित्र परिवाराच्या सहकार्याने ही संस्था ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम लवकरच सुरू करत आहे
‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी’ रत्नागिरी : ‘सार्वजनिक साफसफाई, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘प्लास्टिक पिशव्या द्या, कापडी पिशव्या घ्या’ यासारखा कल्पक उपक्रम ‘दी गिफ्ट ट्री’सारखी संस्था राबवते, तेव्हा तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. प्लास्टिमुक्त रत्नागिरीसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम
रत्नागिरीत ४० हजार जंगली बियाण्यांचे वाटप रत्नागिरी : येथील सामाजिक वनीकरण विभागातर्फे घेण्यात आलेल्या योजनाविषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत पुणे येथील हरित मित्र परिवाराचे प्रमुख महेंद्र घागरे यांनी सुमारे ४० हजार जंगली वनस्पतींच्या बियाण्यांचे मोफत वाटप केले. आगामी दोन वर्षांत बीज पेरणीतून पाच कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घागरे यांनी या वेळी बोलून दाखवला
‘फ्रेंडशिप डे’ला झाडांशी मैत्री रत्नागिरी : ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली, की तरुणाईला वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्र-मैत्रिणींना ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून हा दिवस साजरा केला जातो मात्र या वर्षी रत्नागिरीत हा दिवस झाडांशी मैत्री करून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी येथील पर्यावरणप्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language